Published On : Sat, Apr 25th, 2020

इंद्रपाल वासाडे चा शेतात झाडाखाली मृतदेह मिळाला.

कन्हान : – टेकाडी येथील इंद्रपाल वासाडे यांचा शेत शिवारातील आंब्या च्या झाडाखाली मृता अवस्थेत मृतदेह आढळल्याने कन्हान पोलीसानी पंचना मा करून शवविच्छेदन करून टेकाडी येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला. मुत्युचे कारण शवविच्छेदनाच्या तपासणी अहवाल आल्यावरच कळु शकेल.

प्राप्त माहितीनुसार शुक्रवार (दि.२४) ला दुपारी इंद्रपाल शामराव वासाडे वय ३८ वर्ष रा टेकाडी यांचे घरी पत्नी सोबत भांडण झाले. रागाच्या भरात इंद्रपाल घरून निघुन गेला. दुपारी काही शेतक-यांनी अमृत टाकळखेडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली इंद्रपाल वासाडे मृता अवस्थेत दिसुन आल्याने कन्हान पोलीसाना माहिती देताच पोली स घटनास्थळी पोहचुन घटनास्थळावर पंचनामा करून उत्तरिय तपासणीकरिता कामठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवि ण्यात आले. शनिवार (दि.२५) ला शव विच्छेदन करून दुपारी राहते घरून अंतिम यात्रा काढुन श्मशान घाट टेकाडी येथे अंतिम संस्कार करण्यात आला.

त्याच्या मागे म्हतारी आई, पत्नी व दोन लहान मुली आहे. शुक्रवार ला त्याची पत्नी मनिषा वासाडे हिला सुध्दा मेयो रूग्णालय नागपुर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले अशी माहीती आहे. इंद्रपालच्या मृत्युचे कारण कळु शकले नाही. ते शवविच्छेदनाच्या अहवाल आल्या वरच समोर येईल. कन्हान पोलीस स्टेशनचे हेकॉ. नरेश वरखडे पुढील तपास करित आहे.