नवी दिल्ली : चांद्रयान ३ ही भारताची चंद्राच्या अध्ययनासाठी पाठवलेली तिसरी मोठी मोहीम आहे. यापूर्वी पहिल्या मोहीमेत यश आले होते. तर दुसऱ्या मोहीमेत अपयशाचा सामना भारताला करावा लागला होता. मात्र चांद्रयान 3 यशस्वी होईल अशी इस्रोला अपेक्षा आहे. शनिवारी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे.
चांद्रयान चंद्राभोवतीच्या १७०x४३१३ या कक्षेत फिरत आहे. ९ ऑगस्टला चांद्रयान पुढील कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्रोने दिली आहे.
१४ जुलैला इस्रोच्या चांद्रयान ३ ने चंद्राकडे भरारी घेतली. पृथ्वीच्या कक्षेत फेरीत मारल्यानंतर ५ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ९ ऑगस्टला चांद्रयान आणखी आतल्या कक्षेत ढकललं जाईल. १७ ऑगस्टला चांद्रयान चंद्रापासून १०० किलोमीर उंचीवर स्थिरावेल. नंतर २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.