Published On : Mon, Nov 11th, 2019

भारतीय संस्कृतित तुळशिला विशेष महत्व- अजय कदम

कामठी :-मानवी जीवनासाठि तुळशी ही वनस्पति एक वरदान ठरली असून आरोग्य चांगले होण्यासाठी तुळशिचा नेहमीच उपयोग होत आहे त्यामुळेच पारंपरिक पद्धतीने तुळशिचे झाड़ अंगनात लावन्यची प्रथा आजही कायम आहै दिवाळीनन्तर पावसाळ्याचा ऋतु संपताच शरद व हेमंत ऋतुच्या आगमना बरोबरच स्त्री पुरुषाच्या मिलनसाठी उत्तम काळ असल्याची सूचना हा ऋतु देत असून भारतोय संस्कृतित तसेच आरोग्यशास्त्रने तुळशिला विशेष महत्व दिल असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांनी भागूबाई समाज भवन येथे आयोजित सामूहिक तुळशी विवाह कार्यक्रमात व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रभाग क्र 10 अंतर्गत येणाऱ्या परिसरातील भागूबाई समाजभवणात सामूहिक तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने पार पडला.यावेळी मोठ्या संख्येत गृहिणींनी या तुळसी विवाहाला उपस्थिती दर्शविली तर या तुळसी विवाहाच्या मंगलाष्टके पदाधिकारी कल्पना अवचट यांनी पार पाडले .

याप्रसंगी मंदिरातील पदाधिकारी कल्पना अवचट,दामोधर अवचट,प्रकाश इटनकर, प्रभाकर तराळे,मनोहर भुजाडे,कोमल तरारे, शालिनी इटनकर,मनोरमा तरारे आदी उपस्थित होते