Published On : Mon, Nov 27th, 2017

नागपूर महानगरपालीकेमध्ये “भारतीय संविधान दिवस” संपन्न


नागपूर: भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी व सर्व नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी यादृष्टीने राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. परंतु या दिवशी रविवार असल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिके तर्फे आजदिनांक २७ नोव्हेंबर, २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता भारतीय संविधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील छत्रपति ‍शिवाजी महाराज, नविन प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त अश्विन मुदगल यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न्‍ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून सामुहिकरित्या वाचन करवून घेतले.

यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तबाने, नगरसेवक किशोर जिचकार, अपर आयुक्त रवीन्द्र कुंभारे, स्मार्ट सीटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, उपायुक्त रवीन्द्र देवतळे, अती.उपायुक्त राजेश मोहिते, निगम सचिव हरीश दुबे, सहा. आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, सहा.आयुक्त मिलींद मेश्राम, सहा. संचालक, नगररचना सुप्रीया थुल, विकास अभीयंता सतीश नेरळ, कार्य.अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (वि’द्युत) एस.बी.जैस्वाल, कार्यकारी अभियंता (हॉटमीक्स प्लान्ट) राजेश भुतकर, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभुळकर, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, प्रमुख अग्निशामक अधिकारी राजेन्द्र उचके, शीक्षणाधीकारी श्रीमती संध्या मेडपल्लीवार, नागरी सुविधा केन्द्राचे प्रमुख आर.एस.काबळे, निगम अधिक्षक राजन काळे, ग्रंथालय अधीक्षक पारस शर्मा, म.न.पा. कर्मचारी युनीयनचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, शशीकांत आदमने,विशाल शेवारे, दीलीप तांदळे, सुधीर कोरमकर, कल्पना निकोसे, पुष्पा बुटे, पुष्पा तराळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत सर्जेराव गलपट यांचेसह म.न.पा.चे अधीकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविका व संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून “भारतीय संविधान दिवस” संपन्न
भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी व सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यादृष्टीने राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या सर्वच शाळेत भारतीय संविधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन म.न.पा.च्या सर्वच शाळेत भारतीय संविधानाच्या उध्देशीकेचे वाचन करण्यात आले. तसेच परिसरात संविधान रॅली, निबंध स्पर्धा, संविधान लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करुन म.न.पा. शाळेतसुध्दा संविधान दिवस साजरा करण्यात आला.