नवी दिल्ली – भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिस्री यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली की भारत आणि पाकिस्तानदरम्यान आज संध्याकाळी ५ वाजेपासून सीजफायर (शस्त्रसंधी) लागू करण्यात आले आहे. मिस्री यांनी स्पष्ट केले की हा सीजफायर भारताच्या अटींवर करण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा तणाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. येत्या १२ मे रोजी भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) पुन्हा एकदा चर्चेसाठी भेटतील, असेही मिस्री यांनी सांगितले.
सीमेवरील शांतता आणि स्थिरतेच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. आता या पुढील चर्चेतून दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.