Published On : Thu, Jan 4th, 2018

भारत व चीन द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील – मुख्यमंत्री

मुबंई : भारत व चीन या दोन देशातील द्विपक्षीय संबंध येणाऱ्या काळात आणखी दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृहावर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य मेंग जिआंगा फुंग यांच्यासह अकरा सदस्यीय शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

भारत व चीन या दोन देशातील अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, वाणिज्यिक व्यवहार यावर चर्चा झाली. चीनने दारिद्र्य निर्मुलनाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

चीन विविध क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती मेंग जिआंग फुंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.