Published On : Thu, Jan 4th, 2018

राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्ताने 9 जानेवारीला प्रदर्शनाचे आयोजन

Advertisement

मुंबई : दरवर्षी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने राज्यभर ग्राहक जागृतीचे उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही राज्यात सुमारे 300 तालुक्यांमध्ये ग्राहकजागृती करण्यात आली याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मंगळवार दि.9 जानेवारी 2018 रोजी मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात ग्राहक जागृती संदर्भातील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिधा वाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक दिलीप शिंदे यांनी आज दिली.

या प्रदर्शानाच्या आयोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष (मंत्रीस्तरीय) अरुण देशपांडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी सुचित्रा देशपांडे, विविध संस्थांचे प्रतिनिधी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री. शिंदे पुढे म्हणाले, या प्रदर्शनाचे उद्‍घाटन मंगळवारी सकाळी 11.00 वाजता अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिश बापट यांच्या हस्ते ग्राहक चळवळीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येईल. हे प्रदर्शन सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

यावर्षी केंद्र शासनाकडून इमर्जिंग डिजिटल मार्केट्‍स : इश्युज अण्ड चॅलेंजेस इन कंझ्युमर प्रोटेक्‍शन (Emerging Digital Markets: issues and challenges in Consumer Protection) ही संकल्पना ठरविण्यात आली आहे. या प्रदर्शनात अन्न व नागरी पुरवठा विभाग, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन शास्त्र यंत्रणा, बेस्ट विभाग, पोलीस विभाग, पेट्रोल आणि तेल संस्था, गॅस पुरवठादार, परिवहन तसेच ग्राहकांशी संबंधित इतर संस्था यात सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनातून ग्राहकांना फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement