Published On : Thu, Oct 12th, 2017

महिला बचतगटांच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारणार : महापौर नंदा जिचकार

Advertisement

नागपूर : महिला बचत गटांच्या सक्षमीकऱणाच्या उद्देशाने महिलांसाठी हक्काची कायमस्वरुपी बाजारापेठ मनपाच्या वतीने तयार करण्याचा मानस असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला बचतगटांद्वारे दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करण्यात येते. मात्र बाजारपेठेअभावी त्यांना वाव मिळत नाही. मोठमोठ्या उद्योगांची सुरुवात अशीच होत असते. यातून प्रोत्साहन घेत, आपला उद्योग उभारा, मनपा आपल्या पाठीशी आहे, असे उद्‌गार महापौर नंदा जिचकार यांनी काढले.

नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाद्वारे महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून मनपाच्या नऊ झोनमध्ये दोन दिवसीय महिला स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन १२ व १३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी धरमपेठ झोन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, नगरसेवक सुनील हिरणवार, जगदिश ग्वालवंशी, नगरसेविका उज्जवला शर्मा, दर्शनी धवड, सहायक आय़ुक्त महेश मोरोणे यांची उपस्थिती होती.
लक्ष्मीनगर झोन येथे आयोजित महिला स्वयंरोजगार मेळाव्याचेही उद्‌घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, विधी समिती सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे, नगरसेविका लक्ष्मी यादव, झोनच्या सहायक आय़ुक्त सुवर्णा दखने यांची उपस्थिती होती.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाच्या सर्व झोनमध्ये आयोजित मेळाव्याचे उद्‌घाटन महिला व बाल कल्याण समिती सदस्य व झोन सभापतींच्या हस्ते झाले. मंगळवारी झोन येथील मेळाव्याचे उद्‌घाटन आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते झाले. तर गांधीबाग झोन कार्यालयातील मेळाव्याचे उद्‌घाटन प्रवीण दटके यांच्या हस्ते झाले. यावेळी झोन सभापती सुमेधा देशपांडे, उपसभापती श्रद्धा पाठक, मनपाचे माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी उपस्थित होते. या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घेण्याचे आवाहन महापौरांनी केले. नऊ झोनमध्ये सुरू झालेल्या महिला स्वयंरोजगार मेळाव्यांची पाहणी महिला व बाल कल्याण सभापती वर्षा ठाकरे यांनी केली.

दर्जेदार वस्तू एकाच छताखाली

महिला बचतगटांद्वारे निर्मित फराळ, दिवे, आकाश कंदील, भेट वस्तू आदी आकर्षक साहित्य या मेळाव्यात एकाच छताखाली उपलब्ध आहे. तरी नागपूरकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बाल कल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement