Advertisement
नागपूर: भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन सोहहळयानिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ध्वजारोहण झाले. यावेळी पोलिस दलाच्या सशस्त्र जवानांनी पथसंचलन करुन मानवंदना दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी उपसि्थत होते. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी यांना भेटून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Advertisement