Published On : Thu, Sep 19th, 2019

पाणी साठा वाढल्याने तोतलाडोह- पेच ओवरफ्लो.

Advertisement

तोतलाडोह चे 10 गेट तर पेच चे 14 गेट उघडले . नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा .विलक्षनिय द्रुश्य बघण्याकरीता पर्यटकांनी गर्दी केली असल्याचे चित.

रामटेक – नागपूर जिल्हातील सर्वात मोठे धरण असलेले तोतलाडोह बुधवारी ओवरफ्लो झाले .पाण्याचे येणे मोठया प्रमाणावर सुरू असल्याने सुरवातीला सकाळी 6 वाजता 2 दरवाजे आणि नंतर टप्या टप्प्याने सायंकाळपर्यंत 10 दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याचे पेंच सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता जे .बी . तूरखेडे तसेच उपविभागीय अभियंता राजेश धोटे यांनी सांगीतले .

तोतलाडोह धरणातील दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठावर राहणाऱ्या गावकऱ्यांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .तोतलाडोह येथील सोडलेल्या पाण्यामुळे नवेगाव खैरी येथील धरण भरेल . ते धरण पूर्णपणे भरल्यानंतर पाणी नदीमध्ये सोडल्या जाईल .ते सोडताना विशेष काळजी घेतल्या जात आहे .पेच धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. चौराई धरण भरल्याने , त्या धरणातून क्षमतेपेक्षा जास्तीचे पाणी तोतलाडोह धरणात मोठय़ा प्रमाणात सोडल्या जात आहे.

तोतलाडोह धरण फुल्ल झाल्याने येथील पाणी पेच जलाशयात सोडल्या जात आहे. त्यामुळे पेच धरण आपली पाण्याची क्षमता औलांडत असल्याने निरंतर पेच जलाशयातून पेच नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याची पातळी अधिकच होत असल्याने पेच जलाशयाचे 14 दरवाजे उघडण्यात आले असून, पेच नदीत पाणी सोडले जात आहे.नदीकाठी राहणाऱ्या गावाला व नागरिकांना धोका होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश पोलीस अधिकारी व शासकीय अधिकारी यांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगीतले .हे विलक्षनिय द्रुश्य बघण्याकरीता पर्यटकांनी गर्दी केली असल्याचे चित अनुभवास आले .