Published On : Thu, Aug 1st, 2019

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी युवा माहिती दूत उपक्रम सहभाग वाढवा

नागपूर : प्रशासनाच्या विविध उपक्रमासोबतच विविध योजनांची माहिती समाजातील वंचितांपर्यंत पोहचविण्यासोबतच प्रशासनासंदर्भात युवकांना जोडणाऱ्या युवा माहिती दूत या उपक्रमात युवकांनी सामाजिक बांधिलकी समजून सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले.

शिवाजी विज्ञान महाविद्यालयात युवा माहिती दूत आणि युवकांचा सहभाग यासंदर्भात अनुलोम आणि माहिती व जनसंपर्क विभागातर्फे युवा माहिती दूत या उपक्रमाचा शुभारंभ आज झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एम. पी. ढोरे, अनुलोमचे विभागीय समन्वयक हेमंत ब्राम्हणकर, जिल्हा समन्वयक अभय कुळकर्णी, माहिती अधिकारी शैलजा वाघ, विज्ञान महाविद्यालयाचे समन्वयक व विभाग प्रमुख डॉ. ऊसळे यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमात शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे माहिती दूत उपक्रमात 169 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 60 विद्यार्थ्यांनी माहिती दूत म्हणून यावेळी नोंदणी केली.

माहिती दूत उपक्रम हा शासनाच्या विविध योजना युवा माहिती दूताच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी स्वीकारुन थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी युवकांचा सहभाग या उद्देशाने सुरु करण्यात आले असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही माहितीदूतसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. युवकांनी या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, अंमलबजावणीची कार्यपद्धती लाभार्थी निवड करताना राबविण्यात येणारी पद्धत आदी माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना यासाठी मोबाईल ॲपवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

विभागीय समन्वयक हेमंत ब्राम्हणकर यांनी माहितीदुत उपक्रमाविषयी विस्तृत माहीती दिली.माहितीदुत या उपक्रमामुळे शासन व जनतेतील संवाद पुन्हा जिवंत होईल असे त्यांनी सांगीतले.

बदल घडविण्यासाठी तरूणाईनी पुढे येण्याचे आवाहन केले.प्रेरीत होवून सकारात्मक दृष्टीकोन करून माहितीदूत उपक्रमात महाविदयालयीन विदयार्थी विदयार्थीनीनी या उपक्रमात सहभागी होण्याचे सहभागी होवून प्रशासन आणि जनता यामधील दुवा म्हणून कार्य करावे, असे सहाय्यक संचालक शैलजा वाघ-दांदळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

प्रारंभी अनुलोमचे जिल्हा समन्वयक अभय कुळकर्णी यांनी युवा माहिती दूत या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली व उपक्रमामध्ये मोबाईल ॲपद्वारे कसे सहभागी होता येईल, यासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी मोठ्या प्रमाणात‍ विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Advertisement
Advertisement