नागपूर : महाराष्ट्र विधान सभेच्या 288 जागांसाठी काल मतदान पार पडले आहे. राज्यात मतदानाचा टक्का वाढलेला आहे. या मतदानानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारा माध्यमांशी संवाद साधला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मतदानाची टक्के वारी वाढलेली आहे.त्यामुळे राज्यात महायुतीला फायदा होणार आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपा आणि महायुतीला फायदा होतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर फडणवीस बुधवारी सायंकाळी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ प्रमुख मोहन भागवत आणि माजी सरचिटणीस भैय्याजी जोशी महाल परिसरात असलेल्या संघ मुख्यालयात उपस्थित होते. फडणवीस 15 ते 20 मिनिटे येथे थांबले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संघप्रमुख उभे असल्याची अटकळ बांधली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत यंदा राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतांचा टक्का वाढल्याचं दिसते . अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचं चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळाले.