नागपूर– दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर उपस्थित राहतात. दोन ते तीन दिवसांचे मुक्काम असलेल्या या अनुयायांसाठी पाणी आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांची आवश्यकता असते. यासाठी आयटीआय समोरील मोकळ्या जागेत प्रशासनाकडून तात्पुरती शौचालये उभारली जात होती.
मात्र यंदा या जागेला पक्की भिंत बांधून बंदिस्त करण्यात आल्याने, शौचालयाची जागा वापरात येणार नसल्याने अनुयायांपुढे मोठी गैरसोयीची समस्या उभी राहिली आहे. या पवित्र जागेवर वर्षातून केवळ एकदाच ही सुविधा वापरली जाते, तरीही जागा बंद केल्यामागे प्रशासनाचा हेतू काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
ही केवळ सुविधा हटवण्याची बाब नसून, ही अनुयायांच्या सन्मानाची बाब आहे,असे भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी सांगितले.
त्यांनी प्रशासनाला दोन ठाम मागण्या केल्या आहेत:
पूर्वीप्रमाणेच तात्पुरती शौचालये उभारावीत किंवा तत्सम पर्यायी व्यवस्था त्वरित उपलब्ध करावी
दरम्यान अन्यथा हजारो अनुयायांच्या असुविधेला प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही पँथर संघटनेकडून देण्यात आला आहे.