Published On : Sat, Apr 17th, 2021

रूग्णवाहिकेचे लोकार्पण

कामठी – शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या तर्फे माजी आमदार स्व. यादवराव भोयर यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोरोना महामारीच्या या संकटात नागरिकांच्या सेवे करीता रूग्णवाहिका उपलब्ध करुण दिली.

संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई भोयर यांच्या शुभहस्ते संस्थेचे सचिव व काँग्रेस प्रदेश महासचिव सुरेशभाऊ भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामठी तालुक्यातील नागरिकांसाठी आज शुक्रवारी (ता.१६) रोजी सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई भोयर, संस्थेचे सचिव व काँग्रेस प्रदेश महासचिव सुरेशभाऊ भोयर, संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोयर, श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ मिलींद उमेकर, प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अनुराग भोयर, कामठी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नगरसेवक काशिनाथ प्रधान प्रामुख्याने उपस्थित होते.