Published On : Thu, Jun 4th, 2020

गडचिरोलीत ट्रुनॅट (TrueNat) कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन

Advertisement

गडचिरोली :जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट (TrueNat) कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार च जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याहस्ते झाले. या प्रयोगशाळेत कोरोना पॉझिटीव्ह नसल्याबाबत खात्री केली जाणार आहे.

मात्र रुग्णाला कोविड-१९ ची बाधा झाल्याची खात्री होण्यासाठी नागपूर येथेच संशयितांचे नमूने पाठविण्यात येणार आहेत. किमान या ट्रुनॅट प्रयोगशाळेमुळे कोरोना संसर्ग झाला नसल्याचे आता ५० मिनीटांमध्ये खात्रीने सांगता येईल. जिल्हयातील जास्त जोखमीच्या रूग्णांचे अहवाल तात्काळ स्वरूपात यामुळे तपासता येतील असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी माहिती दिली.

टय़ूबरकुलॉसिस (टीबी) च्या चाचणीत वापरल्या जाणाऱ्या या निदान यंत्रांचा वापर कोविड-१९ तपासणी करण्यासाठी आयसीएमआर कडून नुकतीच परवानगी देण्यात आली होती. यानंतर गडचिरोली जिल्हयातही या प्रकारच्या चाचणीला परवानगी देण्यात आली. उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री उपस्थित होते.