नागपूर: महाराष्ट्र राज्य विदुयत वितरण कंपनीच्या वतीने उमरेड तालुक्यातील शेडेश्वर आणि गंगापूर येथे उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्राचे लोकार्पण उद्या दिनांक १९ सप्टेंबर रोजी राज्याचे ऊर्जा,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित राहतील.
गंगापूर येथे येथे उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रास एकात्मिक ऊर्जा विकास योजनेत तर शेडेश्वर येथे उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रास दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेत निधी मिळाला आहे.
गंगापूर येथील कार्यक्रमास उमरेडचे आमदार सुधीर पारवे, उमरेड नगर परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती विजयालक्ष्मी भदोरिया, जिल्हा वीज नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत राहणार आहेत. गंगापूर येथील लोकार्पण सोहळा सकाळी ११ वाजता तर शेडेश्वर येथील सोहळा दुपारी १२ वाजता होईल.
