Published On : Wed, Sep 20th, 2017

संभाजी ब्रिगेड कोपरा शाखेचे उद्घाटन.

कन्हान : – पासुन पुर्वेस १४ कि. मी. लांब कोपरा गावात मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड शाखा व शाखा फलकांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.नवयुवकांत , सामाजिक बांधिलकी, अभ्यासुवृती, विञानवादी चिकित्सक विचारसरणी आत्मसात करून ज्वलंत समस्या सोडविण्यांच्या सार्थ हेतुने मौदा तालुक्यातील कोपरा गावातील नवयुवकांनी संभाजी ब्रिगेड शाखा स्थापन केली.

आणि संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर येवले सर यांच्या हस्ते व प़मुख अतिथी शिवश्री डॉ. अकुंश बार्शिंगे सर, शिवश्री शांताराम जळते सर, शिवश्री मोतीराम रहाटे सर, शिवश्री ईश्वर डहाके सर, शिवश्री संजय कानतोडे सर, शिवश्री ठाकरे सर, शिवश्री साखरवाडे सर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाखेचे व शाखा फलकांचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मा चंद्रशेखर येवले सरांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन करून कोपरा शाखा अध्यक्ष शिवश्री देवानंद ढोले, उपाध्यक्ष शिवश्री गणेश करारे, शिवश्री ओमप़काश वडे, शिवश्री गोपी डाफ, शिवश्री राहुल ढोबळे, शिवश्री आकाश करारे, शिवश्री भोजराज चौधरी, शिवश्री अर्जुन चौधरी, शिवश्री प़विण चौधरी, शिवश्री दिपक वडे यांची नियुक्तीची घोषणा केली.प्रमुख अतिथीनी संभाजी ब्रिगेडचे कार्य व आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गावातील मान्यवर पोलीस पाटील वडे भाऊ व वरिष्ठ मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.