Published On : Wed, Sep 20th, 2017

पदोन्नती आरक्षण टिकविण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाद मागणार.

Advertisement

कन्हान : – मागासवर्गीयांचे पदोन्नत्तितील आरक्षण टिकविण्यासाठी संघर्ष वाहिनी आणि वसंतराव नाईक कर्मचारी अधिकारी संघटना हया संयुक्तपणे आरक्षण साठी सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे .या संदर्भात घोषणा अामदार निवास नागपूर येथे पार पडलेल्या आरक्षण न्यायीक परिषदेत करण्यात आली.

या कार्यक्रमात मागासवर्गी विधृत संघटनेचे उपाध्यक्ष गोपाळ खम्बाळकर, व नागपूर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ऍड निहालसिंह राठोड, यांनी मागासवर्ग पदोन्नती आरक्षण विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात श्री खम्बाळकर म्हणाले की १९९२ ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठा समोर इंदिरा सहाने विरुद्ध संघ या केसमध्ये कोणत्याही राज्यात ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण देण्याला मर्यादा व् पदोन्नतितिल आरक्षण हे रद्बबातल ठरविले, त्यामुळे १९९५ मध्ये ७७ व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानात १६ (४अ) हे कलम टाकले, व् कलम १६(४अ) नुसार राज्यातील मागास जातींना पदोन्नतित आरक्षण देण्यासाठी १) त्यांचा मागसलेपना सिद्ध करने २) प्रशासनात पुरेसे प्रतिनिधित्व देने ३) कार्यक्षमता कायम राखने हया बाबी तपासून पाहणे गरजेचे आहे, असे सुचविले.परंतु २००६ ला एम्.नागराज विरुद्ध संघ या केसमध्ये प्रशासनात कार्यक्षमता टिकवुन ठेवणे व् त्यसम्बद्धीची संख्यात्मक माहिती उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे, असे होत नसल्यास मागासवर्गीयांना पदोन्नतित आरक्षण देने हे घटनाबाह्य असल्याचे सुचविले आहे.

Gold Rate
15 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900 /-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 1,92,100/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एडव्होकेट निहालसिंग राठोड (नागपुर उच्च न्यायालय) आपल्या भाषणत म्हणाले की मुम्बई उच्च न्यायालयाने हयांच् निर्णयाला उचलून धरित २ विरुद्ध १ न्यायाधीश असा निर्णय देत पदोन्नतितिल आरक्षण हे अनु. जाती/जमाती/व्हि जे एन टी/विशेष मागासवर्ग चे रद्दबातल ठरविले, तसेच व्हि जे एन टी /एस बी सी प्रवर्गच्या आरक्षणाला घटनात्मक संरक्षण नसल्यामुळे कलम १६ (४ अ) नुसार पदोन्नतितील आरक्षण देने घटनाबाहय आहे, असे ४ अगस्त २०१७ च्या आदेशात सुचविले, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी आजच्या परिषदेत निर्णय घेण्यात आला. अध्यक्षीय भाषणत श्री अमर राठोड म्हणाले की संघर्ष वाहिनी तर्फे दीनानाथ वाघमारे व् वसंतराव अधिकारी कर्मचारी संघटना तर्फे एक प्रतिनिधि अश्या या दोन्ही संघटना सयुंक्तपने याचिका दाखल करतील, या न्यायिक लढाइला सरकारी/निमसरकारी कर्मचारी यांनी सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मुकुंद अड़ेवार, संचालन राजू चव्हाण तर राजेंद्र बढ़िये यांनी आभार व्यक्त केले, कार्यक्रमाला लक्ष्मण पोटे, खिमेश बढ़िये , प्रकाश पचारे , दिलीप राठोड़,गोविन्द राठोड़ अड़ नितेश गवलवंशी , प्रेम राठोड़ , प्रकाश डायरे, मनोज राठोड़ , राजू जाजुलवार , विनोद आकुलवार , अड़ टेकाडे , द्वारका इंमडवार ,संजय कोटवार, श्री गोहिणे साहेब,शंकर पूड, अड़ बरुण कुमार , अड़ देवेश कुमार आनंद काकड़े, गोविन्द राठोड, धर्मपाल शेंडे, पुण्डलिक बावनकुळे, प्रकाश डायरे, विनायक सूर्यवंशी, भाग्यश्री ठाकरे, प्रणिती मेश्राम, प्रेमचंद राठोड, पुष्पा बढिये, सुभाष चवरे, व भटक्या विमुक्त जातीतील विविध समाज प्रतिनिधी उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement