
नागपूर: नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने मेडिकल चौक, जाटतरोडी, मोक्षधाम चौक मार्गे पिपळा फाटा-बर्डी बससेवेचे उद्घाटन नगरसेवक विजय चुटेले आणि पाटीदार महिला मंडळाच्या अध्यक्षा तुलसीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
जाटतरोडी बस स्टॉप येथे आयोजित कार्यक्रमाला नगरसेवक विजय चुटेले, अध्यक्षा तुलसीबेन पटेल यांच्यासह उपाध्यक्षा निर्मलाबेन पटेल, रश्मी पटेल, भावना पटेल, सावित्री पटेल, लक्ष्मी पटेल, नीता पटेल, भावना पटेल, गीता पटेल, माया पटेल, जयश्री पटेल, मंजू पटेल, विद्या कांबळे, विजय फुलकर, कमलेश तोमस्कर, अशोक श्रीवात्री, प्रशांत तोमस्कर, साक्षी गोटेकर, विजय फुलकर, कमलेश बैसवारे, सुनील श्रीवास, शुभम मेश्राम, परिवहन विभागाचे रामराव मातकर, डिम्सचे हेमंत कावळे, मनीष डकाह, सुकीर सोनटक्के, नंदकिशोर महतो उपस्थित होते.
सदर बसच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी सहा-सहा फेऱ्या राहतील. तिकीट दर ३३ रुपये राहतील.









