Published On : Mon, Apr 23rd, 2018

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०१८ चे उद्घाटन

Advertisement

Road Safety Campaign 2018

कन्हान: महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कँम (टेकाडी) बंद टोल नाका येथे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०१८ चे उद्घाटन करुन अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता जनजागृती कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०१८ चे उद्घाटन कन्हान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. चंद्रकांत काळे हयांच्या शुभहस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ट नागरिक भगवानदास यादव प्रमुख अतिथी ओरिएन्टल टोल प्लाझा मनसर चे मा. अतुल आमदने, माजी प.स.सदस्य मा. पंढरीजी बाळबुधे,पोलीस पाटील टेकाडी मा. पुंडलिक कुरडकर, जेष्ट नागरिक मा. वंसतराव कांबळे ग्रा.प. सदस्या सिंधुताई सातपैसे, मायाताई मनघटे, सुरेखा कांबळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती रस्ता सुरक्षा अभियानाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले.

सिमेवर देशाच्या रक्षणार्थ युध्दात (मरणा-या) बलीदान होणा-या सैनिका पेक्षा रस्ता अपघातात मरणा-याचे प्रमाण हे कितीतरी पटीने अधिक आहे. यास्तव वाहतुकिचे नियम सर्वानीच काटेकोर पणे पाळुन अपघाताचे प्रमाण कमी करणे ही आजच्या काळात अति महत्वाचे झाले आहे. याच करिता शासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येऊन जनजागृती करण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा बाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. महा. राज्य रस्ता सुरक्षा अभियान सोमवार दि.२३ एप्रिल ते ५ मे २०१८ पर्यत अभियान राबवुन जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थितीत होते.

Road Safety Campaign 2018

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दुर्गेश कटरे हयानी तर महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कँम टेकाडीचे प्रभारी अधिकारी राजेंद्र ठाकुर यांनी उपस्थितीत सर्व पत्रकार, मान्यवर, पोलीस कर्मचारी, नागरिकांचे आभार व्यकत केले. उपस्थितीत सर्वाना अल्पोहार वितरण करून उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.