कोराडीमध्ये ‘महालक्ष्मी जगदंबा आपली बस’ डेपोचे उद्‌घाटन

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे संचालित ‘आपली बस’ ही शहर बस सेवा अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने कोराडी येथे ‘महालक्ष्मी जगदंबा आपली बस’ या नव्या डेपोचे निर्माण करण्यात आले असून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्याचे शुक्रवारी (ता. २०) उद्‌घाटन करण्यात आले.

याप्रसंगी नागपूर महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, परिवहन समिती सदस्य राजेश घोडपागे, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, , श्रमअधिकारी अरुण पिपरुडे, उपअभियंता केदार मिश्रा, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, कोराडीच्या सरपंच सुनीता चिंचुरकर, सदस्य कल्पना कामटकर, निर्मला मोरई, वंदना रामटेके, नरेंद्र धनोले, एनएमआरडीएचे अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, कार्यकारी अभियंता पाग्रून, ग्रामविकास अधिकारी झेलगोंदे, सहायक प्रभव बोकारे, गिरीश महाजन उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणातून नवीन डेपो अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध योजना व प्रकल्पाबाबत माहिती दिली. डेपोच्या जागेलगत असलेली एक एकर जागा परिवहन विभागासाठी राखीव ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोराडी बस डेपो सोलर पॅनलवर निर्मित उर्जेद्वारे चालविण्यात येणार असून यामुळे मोठी बचत होणार असल्याचेही ते म्हणाले व परिवहन विभाग अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या.

परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी प्रास्ताविकातून परिवहन विभागाने मागील काही वर्षात राबविलेल्या विविध लोकोपयोगी प्रकल्पांची व उपक्रमांची माहिती दिली. प्रवाशांच्या दृष्टीने ‘आपली बस’ अधिक सुविधायुक्त करण्यासाठी परिवहन समिती सतत प्रयत्नरत राहील, असेही ते म्हणाले.

मे. ट्रॅव्हल टाईम कार रेन्टल यांना खापरी येथे देण्यात आलेल्या डेपोमध्ये सीनएनजी द्वारे चालविण्यात येणाऱ्या बसेस परिवर्तीत करण्यात येत आहे. त्यामुळे या ऑपरेटरला नवनिर्मिती कोराडी येथील डेपो सोपविण्यात आला आहे. नवीन डेपो १.७८ हेक्टर क्षेत्रात असून १५० बसेस पार्कींगची सोय एकत्रितपणे तेथे होणार आहे. डेपोचे निर्माण व सौंदर्यीकरण एनएमआरडीए मार्फत करण्यात आले आहे. डेपोमुळे कोराडी, खापरखेडा, सुरादेवी, बर्डी, महादुला, वलनी, सिल्लेवाडा, कामठी, कन्हान व परिसरातील गावांना शहर बस सेवेचा लाभ मिळू शकेल. मुख्यत्वेकरून कोराडी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ही बस सेवा सोयीची होणार आहे.