Published On : Mon, Jul 29th, 2019

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे आज उदघाटन

नागपूर: नागपूर म्हणगरपालिकेद्वारा रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे निर्मित आणि संचालित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उदघाटन उद्या २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त रवींद्र ठाकरे, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती ऍड. संजयकुमार बालपांडे, उपसभापती निशांत गांधी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहतील.

सदर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची क्षमता ५० किलो वॉट इतकी असून, यात तीन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोटोकॉलचे वाहन चार्ज करण्याची सोय आहे. CCS आणि CHdeMo हे DC प्रकारचे चार्जर व एक AC चार्जर असे तीन चार्जिंग प्रोटोकॉल आहेत.
२५ किलोवाट बॅटरी असलेले वाहन DC चार्जिंगद्वारे साधारण २० ते २५ मिनिटात चार्ज केल्या जाऊ शकेल. या व्यतिरिक्त भविष्यात महानगर पालिकेद्वारा संचालित इलेक्ट्रिक बसेसदेखिल या चार्जिंग स्टेशनचा वापर करून चार्ज केल्या जाऊ शकतील.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष पुढाकाराने या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली असून, नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर यांनी केले आहे.