Published On : Sat, Jun 27th, 2020

गट ग्रामपंचायत बनपुरी येथे घरकुलाचे उद्घाटन व गृहप्रवेश

कन्हान : – गट ग्रामपंचायत बनपुरी (बेलडोगरी) अंतर्गत मौजा बनपुरी येथे अँड.आशिष जयस्वाल आमदार रामटेक – पारशिवनी विधानसभा क्षेत्र यांचा शुभ हस्ते महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यां चा “अटल बांधकाम कामगार आवास (ग्रा)” या योजने अंतर्गत पारशिवनी तालु क्यातील प्रथम सन-२०१९-२० मध्ये मंजूर घरकुल लाभार्थी सौ. निर्मला राजु नाटकर यांचा घरकुलाचे उदघाटन व गृह प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी मा.राजदिप धुर्वे सहाय्यक कामगार आयुक्त नागपूर,मा.प्रदीपकुमार बम्हनोटे गटविकास अधिकारी पं.स. पार शिवनी, मा.प्रकाश देशमुख प्रकल्प अधि कारी नागपूर, मा.संजय गजभिये सरपंच बनपुरी, मा.खोपे शाखा अभियंता प.स. पारशिवनी, मंगेश मेश्राम, रविंद्र घावडे ग्रा.प.सदस्य, जगदीश वडस्कर ग्राम सचिव बनपुरी, संदीप बावनकुळें पोलीस पाटील बनपुरी, श्री.गोळे सचिव तुळसा नंद बहूउद्देशीय संस्था, मुनेश दुपारे, देवा तुमडाम, विनोद भोगे, रामभाऊ घावडे, प्रमोद देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

सदर कार्यक्रमा नंतर आमदार जैस्वाल यांनी मनरेगा अंतर्गत मौजा – बनपूरी, बेलडोंगरी येथील शासकीय जमिनीवर जवळपास ९ ते १० एकर क्षेत्रात करण्या त आलेली सलग सिताफळ व वृक्ष लाग वड यांची पाहणी केली. तसेच मनरेगा मजूर यांच्याशी संवाद साधून त्याना मास्क व सनिटायझर वाटप करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement