Published On : Sat, Jun 27th, 2020

सिहोरा जि प शाळा वर्गखोलीत अवैद्य दारूसाठा मिळाला

कुलुप व कुठलेही तोडफड न होता दारूसाठा कुठुन आला ?

कन्हान : – शाळेच्या पहिल्या दिवसी विद्यार्थ्या विनाच शिक्षकांनी शाळा सुरू केली. शाळेची स्वच्छता करताना वर्ग खोलीत दारूसाठा मिळाल्याने मुख्याध्या पकांनी पोलीसांना माहीती दिली असता कन्हान पोलीसानी वर्गखोलीतुन देशी दारूच्या पाच पेटया व टर्बो स्टांग बियर च्या नऊ बॉटल असा एकुन १४४४५ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

शुक्रवार दि २६ जुन ला महाराष्ट्र शास नाच्या कोविड-१९ च्या मार्गदर्शक सुचना चे पालनकरित शाळेच्या पहिल्या दिवसी शिक्षकांनी विद्यार्थ्या विनाच सकाळी १० वाजता शाळा सुरू केली. शाळा ईमारती ची स्वच्छता करताना दुपारी ४ वाजता वर्ग ४ थी च्या खोलीची स्वच्छता करण्या करिता कुलुप काढुन आत गेले असता वर्गखोलीत देशी विदेशी दारू साठा आढ ळुन आल्याने सर्वच स्तब्ध झाले. मुख्या ध्यापकांनी कन्हान पोलीसांना माहीती दिली असता कन्हान पोलीस घटनास्थ ळी पोहचुन वर्ग खोलीत असलेल्या अवै द्य दारू साठयात भिंगरी देशी दारू च्या पाच पेटीत ७५० एम एल च्या ६० बॉटल किंमत १२९६० रू व टर्बो स्टांग बियर च्या ६५० एम एल च्या नऊ बॉटल किमत १४८५ रू असा एकुण १४४४५ रूपयाचा मुद्दे माल जप्त केला.

पोलीसानी विचारपुस केली असता शाळेचे मुख्याध्यापक रामदास संतोषराव बाबुळकर हयानी सांगितले की शाळेची एक किल्ली माझ्याकडे व दुसरी शालेय पोषण आहार स्वयंपाकी शशिकला मेश्राम यांच्याकडे होती. टाळेबंदी मुळे तीन महिने शाळेत गेलो नाही. घरीच ऑनलाईन कामे सुरू होते. कुठलेही तोडफोड न होता वर्ग खोलीत अवैद्य दारू साठा कुठुन आला ? असा प्रश्न उभा ठाकल्याने कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार नरेश वरखडे हयानी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करून पुढील तपास करित आहे.

नागपुर जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी ताई बर्वे याच्या शंकर नगर कांद्री निवास स्थाना पासुन अवघ्या ३ कि मी वर अस लेल्या जि प शाळा सिहोरा येथे वर्ग खोली ला कुलुप लावुन असुन कुठलीही तोडफोड न होता आत मध्ये दारू साठा कसा का आला ? अशी नागरिकांत चांगलीच चर्चा रंगत आहे.

पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत जि प प्राथ. शाळा सिहोरा येथे अवैद्य दारूसाठा मिळुन आल्याने पं स पारशिव नी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी योगेश ठाकरे व केंद्र प्रमुख अगस्ती मॅड म हयानी शनिवार (दि.२७) ला शाळेत भेट देऊन पाहणी करून मुख्याध्यापक बाबुळकर हयाना विचारणा केली की, दि २५ जुन लाच शाळेची स्वच्छता करायची होती. आणि आपण दि.२६ जुन ला दुपा री ४ वाजे पर्यत वर्ग खोल्याची स्वच्छता का केली ? घटनेची माहीती आदी पं स शिक्षण विभाग अधिकारी यांना का दिली नाही ? तेव्हा मुख्याध्यापकांनी उलटसुल ट उत्तर दिल्याने या प्रकरणाची सखोल चौकसी करून नियमानुसार कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहीती दुरध्व नी वरून विस्तार अधिकारी ठाकरे हयानी दिली.