Published On : Thu, Jan 3rd, 2019

साटक ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी थाटात उदघाटन

कन्हान : – शिक्षण विभाग पंचायत समिती पारशिवनी आणि अखिलेश हायस्कूल साटक यांच्या संयुक्त विद्यमाने साटक येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उदघाटन करण्यात आले .अखिलेश हायस्कूल साटक येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०१८-१९ चे उदघाटन गुरुवार दि.०३ जानेवारी२०१९ ला मा. आमदार डी एम रेड्डी रामटेक विधानसभा यांच्या हस्ते, मा. राजेश कडु सभापती प स पारशिवनी यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी मा शरद डोणकर उपाध्यक्ष जि प नागपुर, सौ कल्पनाताई चहांदे जि प सदस्या साटक, कमलाकर मेंघर, प स सदस्य मा पुण्यशिला मेश्राम, मा सत्यफुला मडावी , मा प्रदीप कुमार बम्हनोटे गट विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी, मा विकास काटोले अधिव्याख्याता वर्ग २ राज्य विज्ञान शिक्षण संस्था , मा सिमाताई उकुंडे सरपंचा साटक, मा गजानन वांढरे उपसरपंच, मा जयदास सोमकुंवर सचिव मनोरमा बहुउद्देशिय विकास मंडळ नागपुर, मा सुभाष भुते अध्यक्ष शा व्य समिती , मा सुदाम पाटील मुख्याध्यापक अखिलेश हायस्कुल साटक यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला .

समारोप व पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार (दि.०४) ला दुपारी २ वाजता मा. राजेश मधुकरजी कडु यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी मा. शरद डोणेकर उपाध्यक्ष जि प नागपुर, सौ कल्पनाताई चहांदे जि प सदस्या साटक, मा शिवकुमार यादव, कमलाकर मेंघर, सौ मायाताई कुसुंबे , सर्व प स सदस्य, सौ सिमाताई उकुंडे सरपंचा साटक, मा गजानन वांढरे उपसरपंच, मा जयदास सोमकुंवर सचिव मनोरमा बहुउद्देशिय विकास मंडळ नागपुर, मा वरूण कुमार सहारे तहसिलदार, मा प्रदीप कुमार बम्हनोटे गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी, मा प्रशांत मोहोड सहाय्यक गट विकास अधिकारी, मा विकास काटोले अधिव्याख्याता वर्ग २ राज्य विज्ञान शिक्षण संस्था , मा सुदाम पाटील मुख्याध्यापक अखिलेश हायस्कुल साटक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता पंचायत समिती पारशिवनी , शिक्षण विभाग, मनोरमा बहुउद्देशिय विकास मंडळाचे अध्यक्ष व सचिव, मा कैलास लोंखडे अधिक्षक शा पो आ, मा योगेश ठाकरे केंद्र प्रमुख, बेले, यादव, वरोकार, दलाल, अवस्थी, मुख्याध्यापक सुदाम पाटील, सर्व मुख्याध्यापक, गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी, अखिलेश हायस्कुल साटक चे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद सहकार्य करीत आहेत.