Published On : Fri, Jun 14th, 2019

हरीतवास्तू निर्मितीमध्ये बांधकाम खर्चात कपात करावी – श्री. नितीन गडकरी

Advertisement

10 व्या प्रादेशिक ग्रिह परिषदेचे श्री. ग़डकरी यांच्या हस्ते उदघाटन

नागपूर :हरित वास्तु निर्मितीमध्ये बांधकाम खर्च कमी करण्यासाठी व वास्तू आर्थिक दृष्ट्या किफायतशीर राहण्यासाठी अभियत्यांनी चाकोरी बाहेर विचार करून नवकल्पनांचा वापर करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी आज नागपूर येथे केले. स्थानिक हॉटेल रेडिसन ब्लू येथे महाराष्ट्र शासनाच्यासार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रीह कांऊसील, तसेच द एनजी रिसर्च इंस्टिटयूट (टेरी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’10 व्या रिजनल ग्रीह काऊंसील’ चे उद्घाटन आज त्याच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिल सगणे, ग्रीहा काऊंसीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ उपास्थित होते.

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे रस्त्यांच्या कामात तलाव नाले यांच्या खोलीकरणातून मिळालेली माती, व इतर सामग्री वापरली जात आहे, यामुळे जल संधारण होऊन रस्तेप्रकल्प खर्चात बचत होत आहे. सांडपाणी, भाजीपाला, फळे यांच्या टाकाऊ सामग्रीतून बायोडायजेस्टर व्दारे बायो.सी एन. जी. निर्मितीचा प्रकल्प आता पूर्व विदर्भातील जिल्हयात सुरू होणार असून नागपूरात बायो-सी-एन-जी. वर संचालित बसेसचेही लोकार्पणही होणार आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

रस्ते बांधकामात खूप समस्या येतात. यामूळे कारखान्यातच प्रीकास्ट रोडची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी रोड प्रीकास्टमध्ये फलाय अ‍ॅश चा वापर केल्यास पर्यावरण संवर्धनासही वाव मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खदानीतून मिळणारी वाळू स्वस्त दरात जनसामान्यांना उपलब्ध करून दिली जात असल्याने बांधकाम खर्चात कपात होत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

याप्रसंगी ग्रीह काऊंसील तर्फे आसित्वात असणा-या इमारतीच्या फाईव्ह स्टार रेटींगचा पुरस्कार पुण्याचे राज भवन, सोलापूरच्या करकंब येथील ग्रामीण रूग्णालय व वाशिम जिल्हयातील मालेगाव जहांगीरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह या तीन वास्तूंना देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना विशेष योगदानाबद्दल मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. ग्रीह राईजिंग अवार्डस् श्रेणी अंतर्गत पुणे नाशिक, कोकण, नागपूर अमरावती असे विभागवार पुरस्कार उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अभियंत्यांना वितरीत करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे होते.

ग्रीह (ग्रीन रेंटींग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटेट असेसमेंट) ही सार्वजनिक इमारतींच्या बांधकामांना ग्रीन रेटींग देणारी संस्था आहे. नागपूरातील 10 व्या प्रादेशिक परिषदेची मुख्य संकल्पना ‘पर्यावरण निर्मितीकरीता धोरणात्मक परिवर्तण ‘ अशी आहे. याप्रसंगी गडकरींच्या हस्ते ग्रीह काऊंसील व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात पर्यावरणसक्षम बांधकामासंदर्भातील एका धोरण पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्यातील सर्व विभागाचे मुख्य अभियंता तसेच राज्याच्या विविध विभागातून आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बहुसंख्येने उपस्थित होते.