Advertisement
नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गारठा वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. विदर्भात नोव्हेंबरनंतरच किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली येण्याची शक्यता आहे.
सध्या नागपुरात पहाटे आणि रात्रीच्या सुमारास हवेत गारठा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. तर दिवसा मात्र अजूनही उकाडा कायम आहे. शहरातील प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यात गुलाबी थंडी राहणार असून डिसेंबर जानेवारी मध्ये थंडी वाढणार आहे.
दरम्यान हा संपूर्ण महिनाच हिवाळा सामान्य असणार आहे. त्यामुळे दिवाळीत कडाक्याची नाही तर गुलाबी थंडी अपेक्षित आहे. त्यानंतर मात्र थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. १५ डिसेंबरनंतर गारठ्यात वाढ होईल आणि किमान तापमानाचा पारा दहा अंशापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे.