Published On : Thu, Apr 23rd, 2020

राज्यात कोरोना बाधित ७८९ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई,: आज राज्यात कोरोनाबाधीत ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५६४९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९ हजार ७२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता २६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १०, पुणे येथे २, औरंगाबाद येथे २ तर कल्याण डोंबिवली येथे १, सोलापूर मनपा येथे १, जळगाव येथे १आणि मालेगाव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १४ पुरुष तर ४ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)*
मुंबई महानगरपालिका: ३६८३ (१६१)
ठाणे: २४ (२)
ठाणे मनपा: १६६ (४)
नवी मुंबई मनपा: १०१ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: ९७ (३)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ७
मीरा भाईंदर मनपा: ८१ (२)
पालघर: १९ (१)
वसई विरार मनपा: ११५ (३)
रायगड: १६
पनवेल मनपा: ३५ (१)

ठाणे मंडळ एकूण: ४३४५ (१०)*
नाशिक: ४
नाशिक मनपा: ७
मालेगाव मनपा: ९४ (९)
अहमदनगर: २१ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: ५ (१)
धुळे मनपा: ४
जळगाव: ४ (१)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ७

नाशिक मंडळ एकूण: १५६ (१४)
पुणे: १९ (१)
पुणे मनपा: ७३४ (५४)
पिंपरी चिंचवड मनपा: ५२ (२)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: ३० (३)
सातारा: १६ (२)

पुणे मंडळ एकूण: ८५१ (६२)*
कोल्हापूर: ६
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)*
औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ३७ (५)
जालना: २
हिंगोली: ७
परभणी: ०
परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ४८(५)*
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: १
*लातूर मंडळ एकूण: १३*
अकोला: ११ (१)
अकोला मनपा: १०
अमरावती: ०
अमरावती मनपा: ७ (१)
यवतमाळ: १८
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ७१ (३)
नागपूर: ३
नागपूर मनपा: ९७ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: १०३ (१)*
*इतर राज्ये: १७ (२)*
*एकूण: ५६४९ (२६९)*

( या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६६११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २६.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.