Published On : Mon, Jul 8th, 2019

जुनी ओली कामठीतील क्रिकेट सट्टा अड्यावर धाड

क्रिकेट सट्टा बुकीस अटक, 31 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त

कामठी :-सुरू असलेल्या विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा दरम्यान कामठीत क्रिकेट सट्टा बुकींच्या माध्यमातून अवैधरित्या लाखो रुपयाची खायवाली होत असल्याची गुप्त माहिती मिळताच डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने नजरचौकीतून योग्यरीत्या सापळा रचून काल 6 जून ला भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट संघात सुरू असलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात जुनी ओली कामठी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अडयावर धाड घालून क्रिकेट सट्टा बुकीस ताब्यात घेत गुन्हा नोंदवून अटक करण्याची यशस्वी कारवाही 6 जून ला केली असून अटक आरोपीचे नाव सुशील शर्मा वय 40 वर्षे रा जुनी ओली कामठी असे आहे.या कारवाहितुन काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल किमती 10 हजार रुपये, सॅमसंग कंपनीची टीव्ही किमती 20 हजार रुपये, युसीएन कंपनीचा सेट टॉप बॉक्स किमती 1500 रुपये असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार अटक क्रिकेट सट्टा बुकीं हा भारत विरुद्ध श्रीलंका या क्रिकेट संघात सुरू असलेल्या विश्वचषक एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत हिणाऱ्या हार जित वर स्वतःच्या घरातून अप्रत्यक्ष रित्या पैशाची लगवाडी घेऊन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी क्रिकेट सट्टा नावाचा जुगार चालवत असल्याची माहिती डिसीपी हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने वेळीच धाड घालून आरोपीस ताब्यात घेऊन त्याकडून 31 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

ही यशस्वी करवाहो डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक व्ही एम धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक माधव शिंदे, पोलीस हवा.मनीष भोसले, दुर्गेश माकडे, मनीष बुरडे, अनंता गारमोडे, नितेश धाबर्डे, हर्षद वासनिक आदींनी यशस्वी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कंबळे कामठी