नागपूर : नंदनवन परिसरातील एका व्यक्तीची सायबर ठगांनी 6.02 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. दुर्गेश श्रीराम गिरीपुंजे (40, रा. प्लॉट क्रमांक 22, नीलकमल नगर, नरसाळा रोड) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 13393994494 या सेल क्रमांकावरून त्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला आणि त्याद्वारे पैसे कमविण्याची ऑफर देण्यात आली.
गिरीपुंजे यांना ठगांनी काही कामे दिली. तसेच त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही रक्कम गिरीपुंजे यांच्या खात्यात ट्रान्सफर केली. भरघोस परतावा देण्याचे आश्वासन देत त्यांना आणखी काही कामे दिल्यानंतर पैसे पाठवण्यास सांगितले.नंतर सायबर चोरटयांनी त्यांची फसवणूक करत त्यांना गंडा घातला.
गिरीपुंजे यांच्या तक्रारीच्या आधारे, सायबर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अन्वये, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (डी) नुसार गुन्हा नोंदविला आणि ठगांविरोधात तपास सुरू केला आहे.