Published On : Thu, Dec 27th, 2018

गांधीबाग झोनमध्ये २८ डिसेंबरला ‘महापौर आपल्या दारी’

Mayor Nanda Jichkar

नागपूर: नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांच्या नागपूर महानगरपालिका क्षेत्रात झोननिहाय आयोजित जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रभागनिहाय समस्या ऐकून घेण्यासाठी, महत्त्वाच्या समस्यांवर, प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी आणि मा. पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळण्याच्या दृष्टीने महापौर नंदा जिचकार ह्या प्रत्येक प्रभागात जाऊन नगरसेवकांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या ऐकणार आहेत.

उद्या २८ डिसेंबर रोजी ‘महापौर आपल्या दारी’ ह्या उपक्रमांतर्गत महापौर नंदा जिचकार सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत गांधीबाग झोनमधील प्रभाग क्र. ८ आणि १८ चा दौरा करणार आहेत.

या उपक्रमांतर्गत महापौर नंदा जिचकार संबंधित प्रभागांच्या नगरसेवकांसह आणि संबंधित झोनच्या अधिकाऱ्यांसह प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतील. प्रलंबित कामांचा आढावा घेतील.