Published On : Sun, Apr 29th, 2018

येत्या ४ महिन्यात नागपूर शहरातील नासुप्रच्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना मालकी हव्काचे पट्टे वाटप करण्यात येईल – मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवी

Advertisement

नागपूर : आज नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत उत्तर नागपूर येथील नासुप्रच्या जागेवरील कस्तुरबा नगर व इंदिरा नगर झोपडपट्टीवासियांना मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस आणि मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झोपडपट्टीवासियांना मालकी हव्काचे पट्टे वाटप करण्यात आले.

मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी* :- उत्तर नागपुरातील झोपडपट्टीवासियांची मालकी हव्काचे पट्टे मिळण्याबाबत बरेच वर्षापासुन मागणी होती, या प्रलंबित विषयांना मा.मुख्यमंत्री यांनी आदेश काढून हा प्रश्न मार्गी लावला ज्यामुळे शहरातील बरेच झोपडपट्टीवासियांना यांचा फायदा होणार असून गरीब लोकांना याचा फायदा होणार आहे, नासुप्र द्वारे योग्यरीतीने झोपडपट्टी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस* : उत्तर नागपूर करीता आजचा दिवस अतिशय महत्वाचा असून नागरिकांना त्यांच्या मालकी हव्काचे पट्टे देण्यात येत आहे हि एक आनंदाची बाब आहे. गरीब माणसाला त्याचे अधिकार मिळाले पाहिजे व शासन याची दखल सुद्धा घेत आहे. येणार्या ४ महिन्यात नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना त्यांच्या मालकी हव्काचे पट्टे देण्यात येईल.

इंदिरा नगर झोपडपट्टीत* नासुप्र द्वारे करण्यात आलेल्या पीटीएस सर्व्हेनुसार एकूण ४२८ झोपड्यांना पीटीएस क्रमांक देण्यात आलेला आहे. यापैकी ६९ झोपड्या खेळाच्या मैदानाकरिता आरक्षित जागेवर वसलेल्या आहेत, ९७ झोपड्या इतर खसरा मध्ये येत आहेत व उर्वरित २६२ झोपड्या वाटपास पात्र आहेत.

तसेच *कस्तुरबा नगर झोपडपट्टी*, खसरा क्रमांक ७,८ मौजा इंदोरा अधिसूचित कोड क्र. २१८ मध्ये एकूण पट्ट्याची संख्या १०० झोपड्यांना पीटीएस क्र. देण्यात आले आहेत. यापैकी ११ अर्ज प्राप्त व ८९ झोपडपट्टीवासियांनी दस्तावेज सादर केलेले असून ४८ झोपडपट्टी वासी वाटपास पात्र आहेत. उर्वरित ४१ झोपडपट्टीवासियांनी शासन निर्णयनुसार दिनांक ०१.०१.२००० पूर्वीचे वास्तव्याचे दस्तावेज सादर केलेले नाही,सदर दस्तावेजांची पूर्तता त्यांनी केल्यास ते वाटपास पात्र ठरतील.

यावेळी मा. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, मा. महापौर श्रीमती. नंदा जिचकार, मा. खासदार पद्मश्री विकास महात्मे, आमदार श्री. सुधाकर देशमुख,श्री.सुधाकर कोहळे,श्री.विकास कुभारे,श्री.कृष्णा खोपडे,श्री.मिलिंद माने,श्री. गिरीश व्यास,नासुप्र विश्वस्त श्री. विव्की कुकरेजा,श्री.भूषण शिगने, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी श्री. अश्विन मुद्गल,महाव्यवस्थापक श्री. अजय रामटेके, अधीक्षक अभियंता श्री. सुनील गुज्जेलवार, कार्यकारी अभियंता(उत्तर) श्री.चिमूरकर, श्री.राउत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती. रेणुका देशकर व आभार प्रदर्शन महाव्यवस्थापक(नासुप्र)श्री.अजय रामटेके यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement