Published On : Fri, Oct 27th, 2017

नागपुर शहरात पुन्हा एसआयटी विभाग सुरु करावा

नागपूर: बहुजन सेना चे अध्यक्ष सागर डबरासे,प्रभारी प्रफुल मानके,संस्थापक किशोर उके यांच्या नेतृत्वात्त नागपुर चे निवासी जिलाधिकारी के.एन.के.राव तर्फे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले, निवेदनाद्वारे सांगितले की नागपुर शहरात पोलिस आयुक्त द्वारा भूमाफीयावर आळा घालण्यासाठी एसआयटी(स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम) प्रॉपर्टी सेल ची स्थापना करन्यात आली होती.परंतु काहीच म्हणजे 2,3 भूमाफ़ियावर च करवाई करुण अवघ्या 7 महिन्यात च एसआयटी बंद करण्यात आली शहरात एसआयटी कड़े आताही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत म्हणून मुख्यमंत्री नी नागपुर शहरात पुन्हा एसआयटी विभाग सुरु करावा अशी मांगनी या निवेदनात करण्यात आली.

निवेदनात सांगण्यात आले की नागपुर शहरात एसआयटी स्थापन झाल्यापासुन विभागाकडे एकूण 1670 प्रकरने आली आहेत परन्तु मोजकेच 35 प्रकरणावर च गुन्हे दाखल करुण करवाई केली गेली. जेव्ह्या की शहरात दिवसेंदिवस भूमाफिया सामान्य नागरिकांच्या जमीनी हड़पताना दिसुन येतात त्यामुळे एसआयटी स्थापन झाल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात न्याय मिळण्याची भावना उपन्न झाली असताना एसआयटी विभाग बर्खास्त करने हे पीडितांच्या जखमेवर मीठ चोळन्यासारखे आहे.

ज्या पीडितानी तक्रारी दिल्या आहेत त्या प्ररकरणाची एसआयटी द्वारा साधी चौकशी सुद्धा करण्यात आलेली नाही मग या पीडितांना न्याय कोन देणार?
एसआयटी कड़े अनेक प्रॉपर्टी सम्बंधित हाई प्रोफाइल प्रकरने दाखल आहेत आणि खऱ्या दिशेने चौकशी एसआयटी द्वारा केली गेली तर शहरातील अनेक भूमाफिया, राजनेते,बिल्डर्स,सरकारी अधिकारी आरोपाच्या भोवरयात येऊ शकतील परन्तु ऐन वेळेवर एसआयटी बर्खास्त करुण सरकारने यांना वाचविन्याचे काम केले आहे.

ज्या उद्देशाने एसआयटी ची स्थापना केली होती तो उद्देश्य पूर्ण झालेलाच नाही. एसआयटी (स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम) नसून सेटिंग इन्वेस्टिगेशन टीम होती असे दिसुन येते. ज्यामुळे अनेक भूमाफ़िया व नेत्यांना वाचविन्याचे कार्य केले गेले. मुख्यमंत्री हे नागपुर शहरातील रहिवासी असल्यामुळे येथील नागरिकांना त्यांच्या कडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन भरपूर अपेक्षा आहेत उलट शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी,हत्या ,चोरी बलात्कार,फिरौती सारखे गंभीर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत अश्या गुन्हेगारीला रोकन्यासाठी मुख्यमंत्री नी प्रामाणिक,आणि कर्ताबगार अधिकारी आणि ज्याना प्रॉपर्टी सम्बंधित ज्ञान आहे अश्या अधिकाऱ्यांची संख्यावाढ करुण त्यांना उत्तम काम करण्यासाठी योग्य ती सुविधा देऊन गुन्हेगारि संपविन्या साठी पुन्हा एसआयटि ची स्थापना करावी
अन्यथा बहुजन सेना पीडिताना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल असा इशारा बहुजन सेनेचे महाराष्ट्राचे प्रभारी प्रफुल मानके यानी दिला.

निवेदन देते वेळी अध्यक्ष सागर डबरासे,संस्थापक किशोरभाऊ उके,प्रभारी प्रफुल मानके,डॉ.धर्मेंद्र मंडलीक,दर्पण सोमकुवर,मोरेश्वर भरतकर,मिलिंद मसराम,अतुल कांबळे,समदभाई कुरेशी,सचिन तायड़े,विवेक पाटील,भारत धोगड़े,गौतम कांबळे,स्वराज वाघमारे उपस्थित होते.