Published On : Wed, Jul 29th, 2020

रामटेक तालुक्यात मुलींनी मारली बाजी.

रामटेक तालुक्यातून योगेश्वरी खेडकर हिने मारली बाजी. 98.40 टक्के घेऊन पटकावला प्रथम येण्याचा मान द्वितीय आशिया शेख, तर तृतीय क्रमांकावर अक्षरा गजभिये,

रामटेक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या 29 जुलैला लागलेल्या निकालाने रामटेक शहर व तालुक्यातील विविध शाळातला निकाल गुणवत्तापूर्ण व उत्साहवर्धक लागला आहे. कोरोना संक्रमण , लॉकडाऊन आणि त्यातही भूगोल विषयाचा न झालेला पेपर शाळा,बोर्ड,परीक्षक यासह सर्वांची उडालेली तारांबळ ,भीती निकाल उशिरा लागतो की वेळेवर या भीतीनेही अनेकांना ग्रासले होते.पण या निकालाने सर्वानाच सुखद धक्का दिला.

श्रीराम विद्यालय रामटेक च निकाल 88.04 लागला असून श्रीराम कंन्या विद्यालय रामटेक येथील तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावणारी
योगेश्वरी खेडकर हिने 98.80 टक्के घेऊन बाजी मारली आहे.अतिशय हलाखीची व नाजूक परिस्थिती असताना व वडील नसतांना तिच्या आईने तिला या यशाचे शिखर गाठण्याा करीता तिला मदत केली. तर द्वितीय क्रमांक आशिया शेख हिने 96.80 टक्के प्राप्त केले आहे.तृतीय क्रमांक अक्षरा गायगये हिने 96.40 टक्के घेऊन बाजी मारली आहे. अशी माहिती प्राचार्य उषा गेडेकर मॅडम यांनी दिली.


रामटेक येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचा ऐकून निकाल 93.00 टक्के लागला असून प्रथम क्रमांक दर्शना कैलास मेंघरे हिने 91.80 टक्के प्राप्त केले आहे द्वितीय क्रमांक तेजस हिंगे ह्याने 91.40 टक्के प्राप्त केले आहे. तृतीय क्रमांक 89.60 टक्के घेऊन मुस्कान कुरेशी हिने पटकावला आहे. अशी माहिती प्राचार्य निखार मॅडम आणि यांनी दिली.

समर्थ शाळेचा निकाल 95.37 लागला असून समर्थ विद्यालयातून प्रथम क्रमांक स्वाती हिरकने 93.20 टक्के प्राप्त केले आहे. द्वितीय क्रमांक प्रणव खोडे ह्याने 92.80 टक्के प्राप्त केले आहे. तृतीय क्रमांक सम्राधी बनसोड हिने 92.20 टक्के प्राप्त केले आहे. अशी माहिती दीपक गिर्धर यांनी दिली.

श्रीराम शाळेचा 94.44 लागला असून. श्रीराम विद्यालय येथून प्रथम क्रमांक मानस फाले याने 92.66 टक्के प्राप्त केले आहे.

-द्वितीय क्रमांक, मधुर अवयरे ह्याने 87.80 टक्के मिळवले आहे. तृतीय क्रमांक सुजल ठीसण ह्याने 85.40 टक्के मिळवले आहे अशी माहिती प्राचार्य मोहन कांगाले यांनी दिली.

ज्ञानदिप कॉन्व्हेंट शीतलवाडी चा 99.20 टक्के निकाल लागला असून येथून प्रथम क्रमांक रितिका राठोड हिने 95.00 टक्के मिळवले.
द्वितीय क्रमांक मृनाली मेश्राम हिने 94.80 टक्के प्राप्त केले आहे. तृतीय क्रमांक मृणाली मेश्राम हिने 94.40 टक्के घेऊन क्रमांक
यांनी प्राप्त केला अशी माहिती अध्यक्ष गजेंद्र चौकसे आणि प्राचार्य गीता भास्कर यांनी दिली.

प्रोव्हिडन्स हायस्कूल मनसर येथील श्रुती जयस्वाल हिने 94 00 टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक
त्रिषणा खोब्रागडे ह्याने 93.20 टक्के घेऊन बाजी मारली आहे

तृतीय क्रमांक भूषण ढोबळे ह्याने 93.00 टक्के मिळवले आहे. अशी माहिती प्राचार्य रिता जॉन यांनी दिली.