Published On : Wed, Jul 29th, 2020

बेलाची साची मुळे वार उमरेड तालुक्यात प्रथम

बेला: लोक जीवन विद्यालयाची साची सुनील मुळे वार ही 97. 60 टक्के गुण मिळवून उमरेड तालुक्यातून सर्वप्रथम आली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोक जीवन विद्यालयात 237 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते त्या पैकी 222 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल एकूण 93. 67 टक्के लागला आहे. तेजस संभाजी वाघाडे या मागासवर्गीय व गरीब विद्यार्थ्याने 93.4 टक्के गुण मिळवून शाळेतून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

घोषित निकालात लोकजीवन चे 65 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर 89 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन त्यांनी शाळा शिक्षक पालक व गावाचा नावलौकिक उंचावला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य व शिक्षण महर्षी चंपतराव देशमुख यांची ही लोक जीवन शाळा पंचक्रोशीत शिक्षण क्षेत्रात नावाजलेली आहे.

दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे सचिव ॲडव्होकेट सुबोध देशमुख, नवनियुक्त प्राचार्य दिलीप खरबडे, उपमुख्याध्यापक ज्ञानेश्वर भेंडे, दहावीचे शिक्षक गन सर्व श्री रवींद्र वानखेडे शरद सुपा रे, आशिष देशमुख शैलेश लोणारे राजेश शिवरकर पाटील गायकवाड व साळवे मॅडम आदींनी गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन केले आहे .