नागपूर -जयताळा परिसरातील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये नितनवरे कुटुंबातील घराच्या मालकीहक्कावरून वाद चिघळला असून, हा वाद आता पोलिस आणि न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. दोन काकांच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी प्रगती थूल, मीनाक्षी बोरकर आणि अमृत नितनवरे यांनी संगनमत करून जबरदस्ती केली असून, खोटी बदनामीही केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रामेश्वर नितनवरे आणि मोरेश्वर नितनवरे अशा या दोन्ही काकांची नावे आहे. त्यांचे घर वडिलोपार्जित असून यावर तीन भावांचे सामान हक्क आहे. मात्र तिन्ही भावांपैकी ज्ञानेश्वर नितनवरे यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले.
रामेश्वर नितनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांकडे चंद्रभान काशिनाथ नितनवरे रमाबाई आंबेडकर नगर येथे सहा खोलींचे घर होते. या घरावर अद्यापही रामेश्वर स्वतः कर भरत असून, त्याचे पुरावे म्हणून पावत्याही त्यांच्या ताब्यात आहेत.
त्यांचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर नितनवरे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनापूर्वी त्यांच्या दोन्ही मुली मीनाक्षी आणि प्रगती यांचे लग्न झाले. ज्ञानेश्वर नितनवरे जिवंत असताना त्यांच्यावर आर्थिक संकट आल्याने वडिलांनी त्यांना केवळ दोन खोलींचे घर वापरण्यास दिले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अमृत नितनवरे तिथे स्थायिक झाला. तसेच त्याने त्याठिकाणी दोन मजली इमारत बांधून सध्या तो त्याठिकाणी राहत आहे.
दरम्यान, घरातील दुसऱ्या दोन खोल्या मोरेश्वर नितनवरे यांच्या नावावर आहेत. त्यांचा मुलगा क्षितिज याचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्या धक्क्यातून सावरत असतानाच, त्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत प्रगती थूल आणि मीनाक्षी बोरकर यांनी कुलूप तोडून त्या रूममध्ये आपला ताबा मिळवला. यावर जाब विचारल्यावर मोरेश्वर यांना शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली. हे सर्व प्रकार मोबाईलवर चित्रीत करून उलट त्यांनीच एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.
काही दिवसांपूर्वी प्रगती थूल हिने रामेश्वर नितनवरे यांचे भाडेकरू दिनेश मेश्राम यांना धमकी देत बाथरूम न वापरण्यास सांगितले. यावर चर्चा करण्यासाठी गेलेल्या रामेश्वर यांनाही शिवीगाळ करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा खोटी तक्रार दाखल झाली.
प्रगती थूल, अमृत नितनवरे आणि मीनाक्षी बोरकर यांच्यावर काही गंभीर पार्श्वभूमी असल्याचे आरोप आहेत. प्रगती थूलवर अमृत नितनवरे यांच्या पहिल्या पत्नीच्या छळाचा ४९८ अंतर्गत गुन्हा आहे. अमृतवरही जुगार अड्डा चालवण्याची तक्रार आहे. मीनाक्षीवर तिच्या जावांनी गंभीर आरोप करत तिची घरातून हकालपट्टी केली होती.
त्याचबरोबर, प्रगतीचा पती विनोद थूल याच्यावरही गंभीर आरोप आहेत. तो स्वतःला एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणवतो, पण प्रत्यक्षात सट्टा आणि जुगारात गुंतलेला असून, लोकांना धमकावण्याचे प्रकार तो करतो.
याप्रकरणी रामेश्वर नितनवरे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणावर आधारित एक खोटं चित्रीकरण करून स्थानिक न्यूज चॅनेलवर एकपक्षीय माहिती देण्यात आली. या मुलाखतीत शेजारी बंडू झोडपे यांच्याकडून खोटी प्रतिक्रिया देण्यात आली, जे अमृत नितनवरे यांचे जवळचे मित्र असल्याचा दावा आहे.
रामेश्वर नितनवरे म्हणाले, “प्रगती, मीनाक्षी आणि अमृत यांनी आमच्या कुटुंबावर खोटे आरोप करून समाजात आमची बदनामी केली आहे. आता हे तिघे मिळून माझे वडील चंद्रभान नितनवरे यांच्या खोट्या सह्या करून बनावट दस्तऐवज तयार करत असल्याचा संशय आहे. आम्ही न्यायालयात विश्वास ठेवत असून, या कटकारस्थानाचा पर्दाफाश लवकरच होईल.या सर्व प्रकरणाचा तपशील सायबर सेल व पोलिसांकडे आहे आणि सध्या ते न्यायप्रविष्ट आहे.