Published On : Wed, Nov 8th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात सख्ख्या भावाच्या ८ वर्षीय मुलीवर काकाने केला बलात्कार, चिमुकलीची प्रकृती गंभीर

Advertisement

नागपूर : शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सख्ख्या भावाच्या ८ वर्षीय मुलीवर अमानुष बलात्कार करून काका फरार झाला. कोरडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. प्रमेश्वर (३४) असे आरोपीचे नाव आहे. तर पीडित मुलीवर मेयो रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, प्रमेश्वर हा मूळचा पांढूर्णा-छिंदवाडा येथील असून तो विवाहित आहे. तो बोखारा येथे एका इमारतीच्या बांधकामावर मूजर आहे. त्याने लहान भावालाही तेथे कामासाठी बोलावले. तो पत्नी व ८ वर्षीय मुलीसह नागपुरात आला. प्रमेश्वर याला दारूचे व्यसन होते. रविवारी त्याचा लहान भाऊ पत्नीसह कामावर गेला होता.

Gold Rate
Feb 11th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,500/-
Gold 22 KT ₹ 1,46,500 /-
Silver/Kg ₹ 2,63,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याचाच फायदा घेऊन दुपारी अंगणात खेळत असलेल्या ८ वर्षीय मुलीला प्रमेश्वरने घरात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पळून गेला. मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. तेवढ्यात तिची आत्या घरी आली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. मुलीला रक्तस्त्राव जास्त झाल्याने प्रकृती बिघडली. त्यामुळे मुलीला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement