नागपूर : नागपुरातील संविधान चौकात आदिवासी समाजाचे आंदोलन सुरु होते. यापार्श्वभूमीवर दिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आंदोलकांना भेट दिली. मात्र आदिवासी महिलांनी अचानक घरकुलाच्या प्रश्नावर त्यांची गाडी अडवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले .
धनगर समाजाला आदिवासी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी समाजाने आक्रमक पवित्रा घेत नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले. आदिवासी मंत्री गावित यांनी बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी आंदोलकांनी त्यांना अडवून आपल्या मागण्या त्याच्यासमोर मांडल्या.
याप्रसंगी त्यांनी आंदोलकांच्या काही मागण्या मान्य केल्या. सोबतच आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली. मात्र आदिवासी मंत्री हे आंदोलन स्थळावरून बाहेर निघत असताना घरकुलाचे प्रश्न घेऊन आदिवासी महिलांनी अचानक मंत्र्यांची गाडी अडवली. यावेळी मंत्री गावित यांनी हा प्रश्नही लवकरच निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन महिला दिले.