Published On : Tue, Jul 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय..डोक्यावर हातोड्याने वार करत पतीने केली हत्या!

Advertisement

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात वसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधांतून खून, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. यासोबतच शहरात चारित्र्याच्या संशयावरूनही वाद होत असून त्याची परिणाम खूनाच्या घटनेत झालेले सातत्याने पाहायला मिळत आहेत.

अशाच प्रकारची धक्कादायक घटना नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय पतीने पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने वार करून तिची हत्या केली. अर्चना रमेश भारस्कर ( वय 38 वर्ष राहणार नंदन झोपडपट्टी गल्ली नंबर दोन)असे मृत महिलेचे नाव आहे. रमेश भारस्कर असे आरोपी पतीचे नाव आहे.

Gold Rate
Apr 21 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,800 /-
Gold 22 KT ₹ 1,43,000 /-
Silver/Kg ₹ 2,53,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार, रमेश भारस्कर बेवडा असून ,पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे , पुढील तपास नंदवन पोलिसांनी सुरु केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement