Published On : Tue, May 1st, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण


नागपूर: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनी जिल्हाधिकारी अश्विन मुद गल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ध्वजारोहण केले व पथसंचलनाची मानवंदना स्विकारली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलिस दलातर्फे पथसंचालन करण्यात आले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ध्वजारोहण केल्यानंतर पथसंचलनाची पाहणी केली तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शिरीष पांडे, श्रीमती विजया बनकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे, अन्न धान्य वितरण अधिकारी एल.जे.वार्डेकर, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.