Published On : Thu, Apr 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दुचाकीवर विसरलेली बॅग चोरट्याने केली लंपास; सीसीटीव्हीत कैद, आरोपी अटकेत

Advertisement

नागपूर– शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सौरभ अहेरे नावाच्या व्यक्तीने आपल्या घरासमोर उभी असलेल्या दुचाकीवर बॅग विसरली आणि काही क्षणांतच चोरट्याने ती लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण वारदात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Featured Products

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूरमधील अत्रे लेआउट परिसरात घडली. सौरभ अहेरे हे काही कामानिमित्त नागपूरहून वर्धा जिल्ह्याकडे रवाना झाले होते. मात्र, घाईगडबडीत त्यांनी आपली बॅग दुचाकीवरच ठेवून दिली. काही वेळातच अज्ञात चोरट्याने संधी साधत बॅग चोरून नेली.

Gold Rate
Apr 15 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,800 /-
Gold 22 KT ₹ 1,44,000 /-
Silver/Kg ₹ 2,56,000/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की, सौरभ यांच्या घरासमोर दुचाकी उभी असून त्यावर काळ्या रंगाची बॅग टांगलेली आहे. त्याच वेळी एक इसम तेथे येतो, आजूबाजूला पाहणी करतो आणि क्षणात बॅग उचलून स्वतःच्या दुचाकीवरून पळ काढतो.
या प्रकरणी सौरभ अहेरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत यंत्रणा कामाला लावली आणि आरोपी अंतरिक्ष चंद्रिकापुरे याला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोरीस गेलेली बॅग जप्त करण्यात आली असून त्यामध्ये ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत अंदाजे २ लाख ६० हजार रुपये), १७ हजार रुपये रोख रक्कम तसेच Apple कंपनीचा चार्जर असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे नागरिकांनी आपली मौल्यवान वस्तू वाहनांमध्ये निष्काळजीपणे न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement