Published On : Mon, Jun 4th, 2018

रा.स्व.संघाची इफ्तार पार्टी वादात?

मुंबई : रमजाननिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे राज्य शासनाच्या सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी वादात सापडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुस्लीम शाखेतर्फे या इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आलं होत. मात्र, मुंबईतील दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप नोंदविला आहे.

सह्याद्री अतिथीगृह ही शासनाची मालमत्ता आहे. त्यामुळे याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमांना अनुमती देता येत नाही. या वास्तूचा वापर केवळ शासकीय कार्यक्रमांसाठीच होणे अपेक्षित असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता फडणवीस सरकार आणि रा.स्व.संघ यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.