Published On : Mon, Apr 27th, 2020

कामठीत ‘अब तक 56’ गृह विलीगिकरण कक्षात 14 तर शासकीय विलीगिकरण कक्षात 42 नागरिक व एक पोजिटिव्ह

कंटेन्मेंट झोन प्रभाग क्र 16 पुढील 10 मे पर्यंत सीलबंद राहणार

कामठी:- संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव भारतासह महाराष्ट्रात सुद्धा पोहोचला याच पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यात जमावबंदी , कायद्यासह लॉकडाऊन लागू झाले आहे त्यातच हा कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठो कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने केलेल्या विविध उपाययोजनेतून शासकीय विलीगिकरण तसेच गृह विलीगिकरण केलेल्या नागरिकांचा आकडा हा 622 च्या घरात पोहोचला होता .

यात नागरिकानो विलीगिकरण कक्षात राहण्यासाठी प्रशासनाला केलेल्या सहकार्यातून आज ही संख्या सुदैवाने 56 वर पोहोचली आहे जे की कामठी करांसाठी दिलासादायक बातमी आहे.ज्यामध्ये 42 नागरिक हे शासकीय विलीगिकरण कक्षात दाखल आहेत तर 14 नागरिक हे गृह विलीगिकरण कक्षात दाखल आहेत त्यातच प्रभाग क्र 16 मध्ये आढळलेला एक कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण हा शासकीय विलीगिकरण कक्षात दाखल आहे.

हा रुग्ण पोजिटिव्ह असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने तडकाफडकी केलेल्या कारवाही अंतर्गत 12 एप्रिल ला हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते आज 26 एप्रिल ला 14 दिवसाचा कोरोनटाईन कालावधी संपला असून हा परिसर कदाचित आज सिलमुक्त करणार असे तेथील नागरिकांना अपेक्षित होते मात्र प्रशासकीय उपाययोजनेतून हा परिसर पुन्हा 14 दिवसासाठो सील बंद म्हणून वाढविण्यात आला असून पुढील 10 मे पर्यन्त हा परिसर सीलबंद राहणार आहे.यासंदर्भात काल 25 एप्रिल ला नागपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या परिसरात भेट दिली असता या कंटेन्मेंट परिसरातील परिस्थिती, पोलीस बंदोबस्त, सिलिंग, जीवनावश्यक वस्तू चा पुरवठा आदींचा आढावा घेतला.

याप्रसंगी तहसीलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभियंता अश्विन चव्हाण, उपमुख्याधिकारी नितीन चव्हाण, आरोग्य विभागातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, वैद्यकीय अधिकारो डॉ शबनम खानुनी, प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी तालुका प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपाययोजनेतुन कामठी शहर हे सध्यस्थीतीत सुरक्षित झोन मध्ये असल्याचे कळल्यावरून प्रशासनाचे कौतुक करण्यात आले तर एक पोजीटीव रुग्ण वगळल्यास कोरोनटाईन चा आकडा हा अगदी कमी प्रमाणात येऊन कोरोणाच्या विषानुवर मात करणयात कामठी शहर हे यशाचे शिखर गाठत असल्याचे सुदधा व्यक्त करण्यात आले.

संदीप कांबळे कामठी