Published On : Wed, Jul 14th, 2021

पूर्व नागपूरात स्मार्ट सिटी ३ मनपा शाळांचा ‘मॉडल शाळा’ म्हणून विकसित करणार

Advertisement

नागपूर : नागपूर स्मार्ट ॲड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेड (NSSCDCL) च्या वतीने पूर्व नागपूर भागातील पारडी, पुनापुर, भरतवाडा, भांडेवाडी भागामधील नागपूर महानगरपालिकाव्दारे संचालित तीन शाळा “मॉडल शाळा” च्या रुपाने विकसित करण्यात येणार आहे .

नागपूर स्मार्ट सिटी च्या “शिक्षित आणि निरामय पीबीपी” उपक्रमांतर्गत मनपाच्या संत कबीर हिंदी प्रायमरी शाळा, महाराणी लक्ष्मीबाई मराठी उच्च प्राथमिक शाळा आणि भरतवाडा मराठी उच्च प्राथमिक शाळेचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती श्रीमती भुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर स्मार्ट सिटी यांनी दिली.

त्यांनी सांगितले की नागपूर स्मार्ट सिटीच्या माध्यमाने या शाळांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील, ज्या सद्यस्थितीत आता शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध नाहीत. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.ची सुविधा, रेन वॉटर हारवेस्टींग, सोलर रुफ टॉप आणि वेगवेगळया सुविधा स्मार्ट पध्दतीने देण्यात येतील. मुलांसाठी, मुलींसाठी व शिक्षकांसाठी स्वतंत्र शौचालये तयार करण्यात येतील.

नागपूर स्मार्ट सिटी तर्फे शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण केले जाईल. फ्लोरिंग, वॉटर प्रूफींग करुन शाळेच्या इमारतीला शिक्षणायोग्य करण्यात येईल. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्रेरीची सुविधा तसेच त्यांना टॅब आणि कम्प्यूटर ची सुविधासुध्दा दिली जाईल. विद्यार्थ्यांच्या सायकली ठेवण्यासाठी पार्किंग शेड तसेच इमारतीची रंगरंगोटी करण्यात येईल. शाळेची सुरक्षा भिंत आणि मुख्य गेट बांधण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी खेळण्यायोग्य मैदान तयार केले जाईल. नागपूर स्मार्ट सिटी तर्फे २ कोटी रुपये या सुविधांवर खर्च करण्यात येतील.

स्मार्ट सिटी तर्फे शिक्षित आणि निरामय पी.बी.पी. उपक्रमासाठी रु १० कोटी चा प्रावधान असून सध्या रु २ कोटी चा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी आणि मनपाच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने ही कामे पूर्ण केली जाईल. याची पुढील देखभाल दुरुस्ती मनपाचा शिक्षण विभाग करणार आहे. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी प्रकल्पाचे कौतुक केले असून त्यांनी विश्वास दर्शविला की मागासलेल्या भागाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी याव्दारे प्राप्त होईल.