Published On : Fri, Sep 4th, 2020

पीपीई किट दहनघाटावर फेकल्या प्रकरणी

तीन झोनचे स्वच्छता अधिका-यांवर मनपाने ठोठावला दंड

नागपूर : मृत कोरोना पाजिटीव्ह रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वापरल्या जाणारे पीपीई कीट वापरानंतर दहन घाटावरच फेकल्या गेलेल्या घटनेची मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी गंभीर दखल घेतली आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने तीन स्वच्छता अधिका-यांना प्रत्येकी १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस पण देण्यात आला आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष्मीनगर झोन, नेहरुनगर झोन आणि गांधीबाग झोनचे स्वच्छता अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस दिला आहे. जर २४ तासाच्या आत स्पष्टीकरण प्राप्त नाही झाले तर त्यांच्या विरुध्द प्रशासकीय कार्यवाही सुध्दा प्रस्तावित करण्यात येईल.

तसेच सर्व झोनचे स्वच्छता अधिका-यांना सुध्दा सूचना करण्यात आली आहे की, शववाहीनीवर मृत शरीर उचलण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना पीपीई किटची विल्हेवाट करण्यासंबंधी निर्देशाचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

दहनघाटांवर पीपीई किटची विल्हेवाट लावतांना पीपीई किट सॅनिटाईज करुन इतरत्र ठिकाणी न टाकता घाटावर उपलब्ध असलेल्या कॅरिबाग, डस्टबिंन किंवा कंटेनर मध्येच टाकावी, असे निर्देश ही देण्यात आले आहे.