Published On : Wed, Apr 14th, 2021

भंडारा जिल्ह्यात आज 1478 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Advertisement

• आज डिस्चार्ज 835
• बरे झालेले रुग्ण 20481
• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 32460
• क्रियाशील रुग्ण 11507
• आज 24 मृत्यू
• एकूण मृत्यू 472
• रिकव्हरी रेट 63.09 टक्के
• मृत्यू दर 01.45
• आजच्या टेस्ट 5855


भंडारा :- जिल्ह्यात आज 835 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 20481 झाली असून आज 1478 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32460 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.09 टक्के आहे.

आज 5855 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 1478 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 2 लाख 66 हजार 898 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 32460 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

Gold Rate
Mar 21 2026 - Time 10.22Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,200 /-
Gold 22 KT ₹ 1,35,000 /-
Silver/Kg ₹ 2,30,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 574, मोहाडी 102, तुमसर 152, पवनी 222, लाखनी 157, साकोली 185 व लाखांदुर तालुक्यातील 86 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 20481 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 32460 झाली असून 11507 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 472 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.09 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.45 टक्के एवढा आहे.

शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

• कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.

• साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.

• साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement