Published On : Tue, Apr 28th, 2020

आडका गावात भरधाव वाहनाची वृद्धाला धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

कामठी ता प्र 27:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या आडका गावातील मुख्य चौक मार्गात भरधाव वेगाणे धावणाऱ्या वाहनांना थांबा मिळावा व अपघात टाळावे यासाठी ग्रा प तर्फे करण्यात आलेले ब्रेकर चे काम अर्धवस्थेत असल्याने

या मार्गावर कमी खोल प्रमाणात असलेले खड्डा वरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन क्र एम एच 31 सी बी 6480 च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला मुख्य चौकात उभे असलेल्या एका वृद्ध इसमाला जोरदार धडक देऊन अपघाती जखमी केल्याची दुर्दुवी घटना सकाळी 8 दरम्यान घडली सुदैवाने जीवितहानी टळली असून जखमी वृद्धांचे नाव राजेरामजी मानमोडे रा आडका ता कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच वेळीच समाजसेवक विजय खोडके यांनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमी ला मदत देत पुढील उपचारार्थ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे


संदीप कांबळे कामठी