जन्म-मृत्यु विभागाचे काम सन 2006 पासून झोननिहाय करण्यात आलेले आहे. सन 2006 पासून मनपाच्या 10 झोन मार्फत जन्म व मृत्युच्या नोंदी घेवून दाखले निर्गमित केल्या जातात. ज्या झोन अंतर्गत जन्म व मृत्युची घटना घडलेली असते त्या झोन अंतर्गत येत असलेल्या संबंधीत दवाखान्यात घडलेल्या घटनेची संबंधीत दवाखान्याने दिलेल्या माहिती अन्वये त्या घटनेची नोंद घेण्यात येते व नागरिकांनी केलेल्या अर्जान्वये त्यांना दाखले निर्गमित करण्यात येतात.
सन 2016 पासून केन्द्र शासनाने निर्देशित केल्यानुसार नविन संगणक प्रणाली (crsorgi.gov.in) मनपा अंतर्गत तसेच संपूर्ण भारतात वापरण्यात येत आहे. या प्रणाली अंतर्गत मनपा कार्यक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या संबंधीत दवाखान्यांना स्वतंत्र असे युझर आयडी व पासवर्ड उपलब्ध आहेत. त्या अंतर्गतसर्वसंबंधीतदवाखानेत्यांचे-त्यांचेस्तरावरऑनलाईनजन्म् व मृत्युचीनोंदकरण्यातयेते व त्यांनीचपाठविलेल्यामुळअभिलेखाप्रमाणेच (उदा. जन्म नोंदणीत आई-वडिलांचे नाव, लिंग, जन्म दिनांक, पत्ता इत्यादी… तसेच मृत्यु नोंदणीत सुध्दा पाठविलेले मृतकाचे नाव, लिंग, मृत्यु दिनांक, वय, इत्यादी… ) नोंदणीला approve करुन नोंद घेण्यात येते व त्यानुसारच नागरिकांनी केलेल्या अर्जान्वये दाखले निर्गमित करण्यात येतात. नोंदणीत दुरुस्ती असल्यास संबंधीत दस्तावेजांची मागणी करुन व मागणी करण्यात आलेल्या दस्तावेजान्वये निबंधक/उप.निबंधक (जन्म-मृत्यु) यांचे समाधान होत असल्यास उक्त नोंदणीत कलम 15 अन्वये दुरुस्तीची प्रकिया करुन दाखले निर्गमित करण्यात येतात.
घरी झालेल्या जन्म घटनांसंबधाने संबंधीत झोन मध्ये दिलेल्या दस्तावेज व माहिती अन्वये नियमानुसार नोंद घेण्याची प्रकिया करण्यात येते. तसेच घरी झालेल्या मृत्यु घटनेची नोंद मृतकाचे नातेवाईक यांचे मार्फत संबंधीत घाटावर दिलेल्या माहिती व दस्तावेजांन्वये मृत्यु घटनेची नोंद घेण्यात येते व नियमानुसार दाखले निर्गमित करण्यात येतात.
महाराष्ट शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर 5, 2019/कार्तिक 14, शके 1941 अन्वये जन्म व मृत्यु दाखले साधारण दाखल्याकरिता रु. 20/- प्रती प्रत शुल्क आकारुण कार्यालयीन तीन दिवसात दाखले निर्गमित करण्यात येतात तसेच तात्काळ दाखल्याकरिता रु. 100/- शुल्क प्रति प्रतआकारुण एका दिवसात दाखले निर्गमित करण्यात येतात. तांत्रीक अडचण असल्यास अडचण दुर होताच दाखले निर्गमित करण्यात येतात.
तसेच जन्म व मृत्युची घटनेची विभागात नोंद उपलब्ध नसल्यास व संबधीत घटनेला एक वर्षापेक्षा अधिकचा कालावधी झाला असल्यास, अशा प्रकरणात कलम 13(3) नुसार मा. प्रथम श्रेणी न्यायीक दंडाधिकारी यांचे आदेशानुसार नोंद घेण्यात येते. त्यापुर्वी नागरिकांकडून संबंधीत दस्तावेजांची मागणी करुन विभागामार्फत नोंद नसल्याबाबतचा अनुपलब्धता प्रमाणपत्र घेवून प्रथम श्रेणी न्यायीक दंडाधिकारी यांचे न्यायालयात प्रकरण दाखल करावे लागते. जन्म व मृत्युचे मुळ अभिलेख गहाळ/नष्ट झाले असल्यास अशा प्रकरणात सुध्दा नियमानसार विलंब नोंदणीची प्रकियेचा अवलंब करुन नोंद करण्यात येते.
तसेच जन्म नोंदणी मध्ये बाळाचे नाव समाविष्ठ करण्याकरिता शासन स्तरावर 15 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. त्याकरिता नागरिकांनी या संधीचा लाभ घेणेबाबत विभागामार्फत यापूर्वीच वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. दि. 27/04/2026 पर्यंत या संधीचा लाभ अधिकाधीक नागरिकांनी घ्यावा याबाबत विभागामार्फत कळविण्यात येते. नावाची नोंद घेण्याकरिता विभागात शैक्षणीक दस्तावेजांची मागणी करुन नावाची नोंद घेण्यात येते. विभागात नमुद जन्म दिनांक व शैक्षणीक दस्तावेजात नमुद जन्म दिनांक यात साम्य असणे आवश्यक आहे. मागील काळात एकूण 5979 नागरिकांना या संधीचा लाभ देण्यात आलेला आहे.











