नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत (Jan Dhan Account) उघडलेली खाती यावर्षी 10 वर्षांची पूर्ण होत आहेत. त्यामुळे अशा खात्यांचे Re-KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर ३० सप्टेंबरपूर्वी हे काम पूर्ण केले नाही, तर तुमचं खाते फ्रीझ होऊ शकतं. खाते फ्रीझ झाल्यास पैसे काढणे, जमा करणे किंवा सरकारी सबसिडीचा लाभ घेणे शक्य होणार नाही.
Re-KYC म्हणजे काय?
बँक खात्याशी संबंधित माहितीचे पुन्हा एकदा अद्ययावत पडताळणी करणे म्हणजे Re-KYC.
यात खातेदाराचे नाव, पत्ता, फोटो, मोबाईल नंबर यासारखी माहिती अपडेट केली जाते.
यासाठी केवळ आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा पुरेसा आहे.
सरकारने ग्रामपंचायती स्तरावर Re-KYC शिबिरे आयोजित केली आहेत, त्यामुळे प्रक्रिया सोपी आहे.
Re-KYC का आवश्यक?
देशभरातील सुमारे 10 कोटी खाती अशी आहेत ज्यांना 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.
जुनी माहिती दुरुस्त करून खातं योग्य व्यक्तीच्या नावावर असल्याची खात्री करण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे.
खात्याचा गैरवापर होऊ नये यासाठीही हे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रधानमंत्री जनधन योजनेचे फायदे :
शून्य बॅलन्सवर खाते उघडण्याची सुविधा.
जमा रकमेवर व्याजाची सोय.
१ लाख रुपयांचा अपघात विमा आणि ३० हजार रुपयांचा जीवन विमा.
खाते सक्रिय ठेवल्यास ५ हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा.
पेन्शन व इतर सरकारी योजनांचा लाभ थेट खात्यात. दरम्यान त्यामुळे सर्व जनधन खातेधारकांनी ३० सप्टेंबरपूर्वी Re-KYC करून आपले खाते सुरक्षित ठेवावे.