Published On : Mon, Sep 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी;२८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशव्यापी संप

सलग पाच दिवस व्यवहारांवर परिणामाची शक्यता
Advertisement

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी;२८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशव्यापी संप

नागपूर : बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांमधील नियमित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या आधी शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने ग्राहकांना सलग पाच दिवस बँक शाखांमधील सेवा प्रभावित होण्याचा सामना करावा लागू शकतो.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संपात देशातील नऊ प्रमुख बँक कर्मचारी संघटना सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे धनादेश वटवणे, रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे यासह शाखांमधील काही प्रत्यक्ष सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर एसबीआयने ग्राहकांना महत्त्वाचे बँकिंग व्यवहार आधीच पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच गरजेनुसार इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि इतर डिजिटल सेवांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रोख रकमेची आवश्यकता असल्यास तीही वेळेत उपलब्ध करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.